तेली समाजाच्या वधुवर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

संपूर्ण राज्यासह देशभर विखुरलेला तेली समाज एकत्र करून विवाह इच्छुक  वधू  वारांना एकत्रित करण्यासाठी वधुवर पालक परिचय मेळावा हि काळाची गरज बनली आहे. २०१७ पासून सलग ५ वर्ष अखंडितपणे असा मेळावा आयोजित करणारे  संताजी विचार मंचाचा हा उपक्रम प्रशंसनीय व स्वागताहार्य आहे असे प्रतिपादन कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर यांनी केले. नगरमधील माउली संकुल सभागृहात तिळवण तेली समाजाचा मोफत वधुवर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळावाच्या उदघाटनप्रसंगी दारुणकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोणी येथील जगन्नाथ गाडेकर, नगरमधील उदयोजक सतीश गवळी, कुबेर उद्योग समूहाचे संचालक बबलूशेठ पातके, उद्योजक राहुल म्हस्के,  विनोद राऊत , शारदा करपे व सौ . मनीषा लांडे  उपस्थित होते. प्रतिमा पूजन आणि दीप  प्रजवलनाने मेळाव्यास सुरवात झाली. त्यानंतर समाजाच्या अडीचशे पेक्षा जास्त उपवर वधू आणि वरानी माउली संकुल सभागृहाच्या मंचावर येऊन आपला परिचय करून दिला. यावेळी एक हजार पेक्षा जास्त वधुवर आणि पालक यांचा परिचय करून देणारी रंगीत फोटो सह असलेली  माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मेळावा अध्यक्ष सोमनाथ दारुणकर, अरविंद दारुणकर, विजय काळे, राजेंद्र म्हस्के, दिनकर घोडके, दिलीप साळुंके, निलेश दारुणकर, संतोष मेहेत्रे, मकरंद घोडके, सोनटक्के श्रीकांत, राजेंद्र करपे, गणेश वालझाडे, मिलिंद क्षीरसागर, योगेश पतके, बाळकृष्ण दारुणकर, संदीप शिंदे, अशुतोष भागवत, विलास काळे, रामदास क्षीरसागर,  किसनराव क्षीरसागर, उमेश क्षीरसागर, बाळासाहेब जुंद्रे, किरण शिंदे, दत्ता करपे, प्रितम मानुरकर, प्रमोद डोळसे, रावसाहेब देशमाने आदींनी परिश्रम घेतले.