दादापाटील शेळके सामाजिक प्रतिष्ठानचे शहरासह नगर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम

रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, वृक्षरोपण व गरजू मुलांना पादत्राणे वाटपाचा समावेश कै. खा. दादापाटील शेळके यांचा सामाजिक वारसा जनसेवेतून पुढे चालविला जात आहे -अंकुश शेळके

अहमदनगर (प्रतिनिधी)- दादापाटील शेळके सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, वृक्षरोपण व गरजू मुलांना पादत्राणे वाटपाचे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. मा.कै. खा. दादापाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खारेकर्जुने ग्रामस्थ व नगर तालुक्यातील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंकुश शेळके म्हणाले की, राजकारण करताना मा.कै. खा. दादापाटील शेळके यांचा सामाजिक वारसा जनसेवेतून पुढे चालविला जात आहे. राजकारणापेक्षा गरजूंना आधार देऊन सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य शेळके कुटुंबीय करत आले आहे. सामाजिक भावनेने प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अष्टविनायक ब्लड बँकेच्या माध्यमातून झालेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ज्येष्ठांची तपासणी करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत खारेकर्जुने गावात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. तर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना पादत्राणे वाटप करण्यात आले. तसेच अनाम प्रेम संस्थेतील अंध विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.