दिलीप सातपुते यांना शहरप्रमुख पदावरून हटविले.

 नगर येथील बहुचर्चित बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणात दिलीप सातपुते यांचावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेने शहर प्रमुख पदावरून तात्काळ हटवले आहे . नगर शहर प्रमुख पदाला स्थगिती देण्याबाबत शिवसेनेचा मध्यवर्ती कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे . सामनातून याबाबतचे अधिकृत पणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे .  कोतवाली पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल केला आहे. यात २२ आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे . त्यात दिलीप सातपुते यांचा समावेष करण्यात आला आहे . सातपुते सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत . 
या प्रकरणात आत्तापर्यंत १० लोकांना अटक झाली आहे,दुसरीकडे गुन्हा दाखल होताच शिवसेनेकडून सातपुतेंवर कारवाई होणार अशी चर्चा सुरु झाली होती .सोमवारी नगर शहर शिवसेना प्रमुख पदाला स्थगिती देण्याबाबत शिवसेन्याचा मध्यवर्ती कार्यालयाकडून अधिकृतपने जाहीर करण्यात आले . त्यामुळे बायोडिझेल प्रकरण दिलीप सातपुतेंचा चांगलेच अंगलट आल्याचे चित्र दिसत आहे. 
दरम्यान नवीन शहर प्रमुख पदाची नियुक्ती लवकरच केली जाईल असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे .  या पदासाठी शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे ,उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव माजी महापौर अभिषेक कळमकर , नगर सेवक गणेश कवडे  यांचा नावाची चर्चा सुरु आहे.