दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना समाजात उभे करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक -कावेरी कैदके
अहिल्या फाऊंडेशनचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना समाजात उभे करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. अंध, दिव्यांगांना आधाराबरोबर प्रेम मिळाल्यास ते निश्चितच आपली प्रगती साधू शकणार आहे. अनेक दिव्यांग व अंध व्यक्ती उच्च पदावर गेले असून, ध्येय गाठण्यासाठी परिश्रमाला शिक्षणाला जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन अहिल्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा कावेरी कैदके यांनी केले.
नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाले असताना स्नेहालय संचलित निंबळक येथील अनामप्रेम संस्थेतील अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी अहिल्या फाऊंडेशनच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी अध्यक्षा कैदके बोलत होत्या. याप्रसंगी सुवर्णा कैदके, पंढरीनाथ ढवण, अलका ढवण, हेत्विक ढवण, अनामप्रेम संस्थेचे शिक्षक राजू भगत, प्रवीण नवले आदी उपस्थित होते.
पुढे कैदके म्हणाल्या की, अहिल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवितांना गरजूंना देखील आधार देण्याचे कार्य सुरु आहे. अंध, दिव्यांग मुले आयुष्यात उभे राहिल्यास सक्षम समाजाची निर्मिती होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन राजू भगत यांनी अनामप्रेमच्या वतीने आभार मानले.