देशातील पहिली टोयोटाच्या कॅम्रीचे आमदार जगताप यांना वितरण

येथील विधान परिषदेचे आमदार अरुणकाका जगताप यांचे कारप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्याकडे असलेला विविध प्रकारच्या कारचा खजिना पहाण्यासारखा आहे. त्यामध्ये आनखी एक भर म्हणून टोयोटाची नवीन कॅम्री दाखल झाली आहे. विशेष म्हणजे नुकतीच लॉच झालेली कॅम्रीचे दोन मॉडेल भारतात आले. पहिली कार केडगाव येथील वासन टोयोटाच्या शोरुममध्ये आमदार जगताप यांना वितरीत करण्यात आली. तर दुसरी कार मुंबई येथे एका ग्राहकाला देण्यात आली आहे. ही कार हायब्रीड असून, ठराविक वेगा पर्यंत बॅटरी व त्या वेगापुढे पेट्रोलवर अ‍ॅटोमॅटिक पध्दतीने चालणारी असल्याने सर्वांना या कारबद्दल कुतूहलता आहे.
देशात दाखल झालेल्या पहिल्या टोयोटाची कॅम्री घेतल्याबद्दल वासन ग्रुपचे चेअरमन विजय वासन यांनी आमदार जगताप यांचे अभिनंदन केले. वासन टोयोटा शोरुमचे जनक आहुजा यांनी टोयोटाच्या कॅम्री या टेन जनरेशनच्या नवीन कारची चावी आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, विकी जगताप, चेतन भळगट, विजय भगत, गौरव नय्यर, शोरुमचे अनिश आहुजा, मॅनेजर दिपक जोशी, रविंद्र थोरात, प्रविण जोशी, अविनाश लाळगे, गुड्डू खताळ, भुपेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.
भारतात अव्वल असलेल्या व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या टोयोटाने भविष्यातील गरज ओळखून बाजारात क्रॅमीच्या रुपाने हायब्रीड कार आनली आहे. आकर्षक स्पोर्टी लूक असलेली ही कार सर्वांना भुरळ घालत आहे. कॅम्रीचा मागील 32 वर्षाचा इतिहास असून, कंपनीने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अद्यावत सुविधा उपलब्ध करुन टेन जनरेशनची कार उपलब्ध केली आहे. ठराविक वेगा पर्यंत बॅटरी व त्यापुढील वेगावर पेट्रोलवर चालणार असल्याने ग्राहकांना चांगला मायलेज मिळणार आहे. कंपनीने एक लीटर पेट्रोलमध्ये 35 कि.मी. पर्यंत अ‍ॅवरेज देत असल्याचा दावा केला आहे. या कारमध्ये 25 लिटर इंजिन व 218 पी.एस. पॉवर इलेक्ट्रिक मोटर (सेल्फ बॅटरी चार्ज), नवीन ग्रिल बंम्पर डिझाईन, रिल्ट आणि स्लाइड मुन रुफ, 18 इंची अलॉय व्हील्स, 9 प्रिमियम जे.बी.एल. स्पीकर, सब वुफर, क्लॅरीफायसह, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने 9 एअर बॅग्ज, थ्री झोन एअर कंडिशनिंग, रियर मॉनिटर विथ सेन्सर आदी सुविधांचा समावेश असलेली क्रॅपी सात आकर्षक रंगात उपलब्ध आहे. कमी मेंटेनन्स व प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने याची बनावट करण्यात आली असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली. नवीन कॅप्रीच्या अधिक माहितीसाठी वासन टोयोटा शोरूमला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9604038234 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.