दो गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस बाळगणारे दोन आरोपी जेरबंद.
राहुरी —— राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे दोन दिवसांपूर्वी एका २५ वर्षीय तरुण गावठी कट्ट्याने ठार झाला होता. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली. काल त्यांनी गावठी कट्ट्यां विरोधात मोठी मोहीम राबविली. नगर मनमाड रस्त्यावर राहुरी फॅक्टरी परिसरात सापळा लावून दोन सराईत गुंडांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.
गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी एक इसम राहुरी फॅक्टरी येथे येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यावेळी राहुरी येथे किशोर बाळासाहेब खामकर, वय ३२, रा. राजुरी, ता. राहाता व किशोर साईनाथ शिणगारे, वय २८, रा. गोमाळवाडी, ता. नेवासा यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून जेरबंद केले. त्यांच्याकडे २ गावठी कट्टे, ६ जिवंत काडतुसे व प्लेझर मोपेड असा १ लाख २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर या पथकातील पो. उप. नि. सोपान गोरे, स. फौ. राजेंद्र देवमन वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, पो. ना. भिमराज खसे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी राहुरी पॅक्टरी, ता. राहुरी येथे जावून सापळा लावला. काही वेळा नंतर दोन इसम विठामाधव थिएटर, राहुरी फॅक्टरी येथे मोटार सायकलवर येतांना दिसले. त्यांना हाताने इशारा करुन मोटार सायकल थांबविण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी मोटार सायकल रोडच्या कडेला थांबविली. पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये दोन गावठी बनावटी कट्टे, सहा जिवंत काडतूसे व प्लेझर मोपेड असे एकण १ लाख २१ हजार २०० रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
याबाबत स. फौ. राजेंद्र वाघ, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.