दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरण यासाठी शेतकऱ्यांच्या जात असलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी
नालेगाव, नेप्ती, निंबळक शिवारातील दौंड मनमाड रेल्वे दुहेरी करण्यासाठी या मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्याने शेतकऱ्यांना कोणताही मोबदला मिळाला नसून मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी दत्ता वामन, सुनील चितळे, राजू म्हस्के, अरुण म्हस्के, रवींद्र कवडे, संतोष लांडे, बापू कवडे, देविदास रोहकले आदी शेतकरी उपस्थित होते. दौंड मनमाड रेल्वे दुहेरी करण्यासाठी नालेगाव, नेप्ती, निंबळक येथील शेतकऱ्यांच्या जमिनीतून पूर्वी रेल्वे रूळापासून 13 मीटर अंतर सोडून रेल्वेने मोठे पोल लावलेले होते परंतु आत्ता चालू पिकामध्ये जमिनीमध्ये 13 मीटर सोडून 26 मीटर ते 30 मीटर शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या शेतीमध्ये अंतर वाढून पोल लावण्यात आले आहे याबाबत आमची सर्व शेतकऱ्यांची हरकत असून आम्हाला जमिनीचे जेवढे क्षेत्र गेलेले आहे त्याचा मोबदला मिळण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.