मुख्यालयात पोलिसांचे वृक्षारोपण

शहरातील पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात पोलीस निरीक्षक अनुपकुमार मडामे यांच्या हस्ते वृक्षरोपणाने झाली. यावेळी सहा. पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात, दिलीप भांबरे, प्रशिक्षक मुसा सय्यद, नितीन मोरे, भरत खेडकर, आरती केर्‍हे, प्रकाश पाठक, प्रणिशा नरवडे, मेघा वाघ, ज्योती केदार, मुरकुटे, भागिरीथ देशमाने, बाळासाहेब कनगरे आदी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक अनुपकुमार मडामे म्हणाले की, पोलीस मुख्यालयाचे परिसर चारही बाजूने हरित करण्यासाठी मुख्यालयातील पोलिसांचा पुढाकार राहणार आहे. झाडे लावण्याबरोबरच त्याची संवर्धनाची जबाबदारी देखील पोलीस कर्मचारी उचलणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह पर्यावरणाच्या संवर्धनासाठी देखील पोलीस योगदान देणार आहेत. पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली आहे. कोरोनाने पर्यावरणासह ऑक्सिजनचे महत्त्व जगा समोर आनले. समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षरोपण चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
पोलीस मुख्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत विविध प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व पोलिस उपनिरीक्षक (गृह) डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.