नगरचा एसटी स्टॅन्ड व रेल्वे स्थानकावर आरटीपीसीआर आणि एचआरसिटी ची सक्ती

अहमदनगर — कोरोना बाबत नगर जिल्हा व्हाटस्पॉट बनत असला तरी कोरोनाची तिसरी लाट फारशी धोकादायक नाही हे ,सर्वांचा ध्यानात आले आहे . मात्र असे असताना आणि कोरोना संसर्ग झाला आहे कि नाही हे शोधण्यासाठी करण्यात येणारी आरटीपीसीआर टेस्ट हि योग्य नाही , ती करण्यात येऊ नये असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले असले तरी, या बाबतचा सुचनेकडे दुर्लक्ष करून नगरचा रेल्वे स्थानकावर हि टेस्ट सक्तीने करण्यात येत आहे , तसेच रेल्वेचा प्रवास करून आलेल्या प्रवाशांना हि टेस्ट करण्याची सक्ती केली जात आहे . तसेच रांगेत उभे असलेल्या प्रत्येकाची एकाच वेळी अँटीजेन आणि आरटीपीसीआर करण्यात येत आहे , वास्तविक प्रथम अँटीजेन टेस्ट करताना रुग्ण पॉसिटीव्ह कि निगेटिव्ह हे तात्काळ समजते पण तरीही महापालिकेचे आरोग्य कर्मचाऱ्यांना ४०० नमुने घेण्याचे टार्गेट दिले असल्याने हे कर्मचारी एकाच माणसाचा दोन्ही टेस्ट करतात आणि टार्गेट पूर्ण झाल्याचे भासवतात . हि निव्वळ फसवणूक आणि धूळफेक आहे . महापालिका अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष देणे आवश्यक आहे .