नगरच्या शिवम टीव्हीएस मध्ये नवीन ५० आयक्यूब इलेक्ट्रिकल स्कूटरचे वितरण
बॅटरी वरील वाहने काळाची गरज- सचिन जगताप.
अहमदनगर (प्रतिनिधी)- टीव्हीएस कंपनीच्या आयक्यूब इलेक्ट्रिकल बॅटरीवर चालणाऱ्या 50 गाड्यांचे वितरण झोपडी कॅन्टीन येथील शिवम टीव्हीएस शोरूम मध्ये जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवम टीव्हीएस शोरूमचे आप्पासाहेब होले, स्वप्नील होले आदीसह ग्राहक सेल्सटीम चे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जास्तीत जास्त गाड्या बॅटरीवर कसे आणता येतील या दृष्टीने इलेक्ट्रिकल बाईक स्कूटर उत्पादन सुरू असून बॅटरीवरील वाहने काळाची गरज बनली आहे. टीव्हीएस च्या नवीन आयक्यूब इलेक्ट्रिकल स्कूटर हे वाहन उत्तम असून 100 किलोमीटर चे मायलेज देखील सर्वांसाठी लाभदायी ठरणार असून कमी खर्चात नागरिक प्रवास करू शकणार आहे. तर इंधन बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सचिन जगताप यांनी सांगितले तर शिवम टीव्हीएस शोरूम चे स्वप्निल होले म्हणाले की टीव्हीएस कंपनीच्या आयक्यूब इलेक्ट्रिकल स्कूटर मध्ये अद्यावत तंत्रज्ञान व आकर्षण लुक ग्राहकांच्या पसंतीस उतरला असल्याने ५० गाड्यांचे वितरण सचिन जगताप यांच्या हस्ते करण्यात आले असून. ग्राहकांच्या पसंदीत उतरलेले शिवम टीव्हीएस शोरूम सर्विस देत महाराष्ट्रातील सर्विस अवार्ड देखील शिवम टीव्ही शोरूम ला मिळाला असून आम्ही ग्राहक देव भव या उद्देशाने आमचे कार्य चालू आहे व गाड्यांच्या बाबतीत व सर्विस देण्याच्या बाबतीत शिवम टीव्हीएस शोरूम हे तत्पर सेवा उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले तर शिवम टीव्हीएस शोरूमचे आप्पासाहेब होले म्हणाले की टीव्हीएस च्या आयक्यूब इलेक्ट्रिकल स्कूटर मध्ये 36 फिचर असून गाडीचे आकर्षण लुक ग्राहकांच्या पसंतीस उतरले व ही स्कूटर बाईक 100 किलोमीटरचे मायलेज देणार असून या स्कूटरमध्ये ऑटोमॅटिक चार्ज होण्याची क्षमता देखील आहे व ही स्कूटर ऑल इंडिया मध्ये २० हजाराच्या वर टीव्हीएस शोरूम च्या माध्यमातून सेल झाली असून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली इलेक्ट्रिकल बाईक असल्याचे सांगितले तर पाहुण्यांचे स्वागत आप्पासाहेब होले यांनी केले तर आभार स्वप्निल होले यांनी मांनले.