नगर जल्लोष (ट्रस्ट) परिवार तसेच नगर परिक्रमा हेरिटेज वॉक चा आरोग्यदायी उपक्रम 2022
या सामाजिक आरोग्यदायी उपक्रमाची सुरुवात आज सकाळी माळीवाडा येथील आराध्य ग्रामदैवत “श्रीविशाल गणेशाच्या” चरणी “तिळगुळ व आलेपाक वडी” अर्पण करून करण्यात आले .यावेळी ट्रस्ट च्या सदस्यांच्या वतीने श्रींची आरती करून उपस्थित सर्वाना तिळगुळ व आलेपाकवडी पाकिट वाटण्यात आले.
यावेळी श्री विशाल देवस्थानचे उपाध्यक्ष श्री.भाऊ खरपुडे,नगर जल्लोष ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा,पंकज मेहेर,बालाजी वल्लाल,ठाकुरदास परदेसी,दिपक गुंडू ,सिद्धांत भुतारे, आदि उपस्थित होते.
या उपक्रमाचे उपस्थितां कडून कौतुक होत होते.