नगर-जामखेड एस टी बसवर अज्ञात हल्लेखोरांनी केली दगडफेक
गेल्या दोन महिन्यांपासून एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर उद्याप तोडगा निघाला नाही. मात्र कारवाई च्या भीतीपोटी या संपाला विरोध करत जामखेड अगारातील काही एस टी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामधिल हजर झालेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी प्रवाशी घेऊन येत असलेल्या जामखेड आगाराच्या नगर- जामखेड या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. त्यामुळे कामगार हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात गेल्या सव्वा दोन महिने उलटले तरी अद्याप पर्यंत संपावर तोडगा निघालेला नाही. मात्र कारवाईच्या भीतीपोटी काही एस टी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. जामखेड अगाराच्या एस टी कर्मचाऱ्यांचा आजचा ६९ वा दिवस आहे. जामखेड च्या एस टी बस स्थानकावरून प्रवाशांसाठी सध्या आठ फेर्या सुरू आहेत. याच अनुषंगाने दि १० रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जामखेड अगाराची नगर-जामखेड, एम.एच ४०, ए.क्यु. ६२२४ क्रमांकाची बस रात्रीच्या सुमारास नरहुन जामखेड कडे येत होती. याच दरम्यान हरीणारायण आष्टाहद्दी जवळील गांधनवाडी फटा या ठिकाणी ही बस आली आसता मोटारसायकल वर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी या बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या व घटनास्थळा हुन पळुन गेले. सुदैवाने या मध्ये कोणी जखमी झाले नाही. हल्ला कोणी व कशामुळे केला याचा तपास पोलीस करीत असुन अज्ञात हल्लेखोरा विरोधात बसचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड अगाराच्या एस टी कर्मचाऱ्यांचा संपाचा ६९ वा दिवस आहे. आगारातुन सध्या आठ फेऱ्या सुरू आहेत. आनेक एस टी कर्मचारी कामावर येण्यास इच्छुक आहेत मात्र असे हल्ले होत आसल्याने इच्छुक एस टी कर्मचारी कामावर येण्यास घाबरत आहेत. त्यातच बसवर दगडफेक झाल्याने आज सकाळ पासून फक्त एकच एस टी बस अगाराबाहेर पडली. हल्लेखोरांचा बंदोबस्त करुन एस टी ला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी हजर झालेल्या एस टी कर्मचाऱ्यान कडुन होत आहे.