नगर बाजार समितीमधील भ्रष्टाचार गावोगाव जाऊन जनतेसमोर आणा .

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

नगर — सेवा सोसायटीची मते बाजार समितीसाठी महत्वाची आहेत ,त्याच प्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी वातावरण तयार करायचे आहे . त्यामुळे बाजार समितीतील भ्रष्टाचार गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडा , गावोगावी युवा सेनेचा शाखा स्थापन करा . असे आदेश शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात दिले .
नगर  बाजार समितीची निवडणूक ,सेवा सोसायटीचा निवडणुका आणि जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणूक या पर्शुभूमीवर हि बैठक घेण्यात आली . यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे , संदेश कार्ले , युवा नेते प्रवीण कोकाटे , संदीप गुंड , पंचायत समिती सदस्य व्ही डी काळे ,रामदास भोर ,गुलाब शिंदे , तालुका प्रमुख राजेंद्र भगत , विश्वास जाधव , प्रकाश कुलट , आदी उपस्थित होते ,प्रा. गाडे म्हणाले मी तालुक्यातील कोणतीही निवडणूक लढवणार नाही . पण जे करायचे ते शेतकऱ्यांसाठी , तालुक्यातील शेतकऱ्यांचा सर्व संस्थांची वाट लागली आहे ,   तालुका सहकारी साखर कारखाना राहिला नही ,दूध संघ शेतकऱ्याचा राहिला नाही तेथील  जागा विकून मोठे मोठे शॉप तयार झाले , जागा कोणी विकली जागा विक्रीत कसा भ्रष्टाचार झाला सर्वाना माहित आहे .  तालुका खरेदी विक्री संघाची अवस्था बेकार आहे , एकमेव राहिलॆल्या बाजार समितीमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला आहे . जेथे दिसेल तेथे जागा विकण्याचा कार्क्रम सुरु आहे . असा आरोप शशिकांत  गाडे यांनी केला  .