नवोदय विद्यालयातील कोरोना बाधितांची संख्या ५२

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोना बाधितांची संख्या ५२ वर पोहोचली आहे . ५० ते ६० जणांचे नमुने येणे बाकी असून या कोरोना बाधितांमध्ये ३० विद्यार्थिनी ,२० विध्यार्थी व २ शिक्षकांचा समावेश आहे . दरम्यान निगेटिव्ह असलेल्या विध्यार्थ्यांना ताब्यात देण्यास  प्रशासनाने नाकार दिल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे . सर्व विध्यार्थी  व शिक्षकांचे पारनेर येथील शासकीय कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . दरम्यान खासदार सुजय विखे ,जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर ,जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ  संदीप सांगळे , जिल्हा शल्य चिकित्सक भूषणकुमार रामटेके ,तहसीलदार शिवकुमार आवळकंठे , गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह तालुका आरोग्यधिकारी डॉ प्रकाश लाळगे , वैद्यकीय अधिकारी डॉ सतीश लोंढे  यांनी नवोदय विद्यालयाला भेट दिली . 
 
या वेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले , नवोदय विद्यालय १४  दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे ,बाहेरील कोणीही आत मध्ये व आता मधील कोणीही बाहेर जाणार नाही. पालकांनी विध्यार्थी घरी नेण्याचा आग्रह करू नये, सर्व काळजी घेतली जाईल ,पालकांनी विध्यार्थ्यांना सवांद  साधण्यासाठी कायम स्वरूपी मीडिया सेंटर ची स्थापना केली जाणार आहे . पालकांशी विद्यार्थ्यांचा नियमित सवांद राहील .  तहसीलदारांचा अधिपत्याखाली एक वैद्यकीय अधिकारी , दोन स्टाफ नर्स कायमस्वरूपी कार्यरत करणार आहेत . 
 
दरम्यान जवाहर नवोदय या विद्यालयातील आमचा मुलांना आमचा ताब्यात द्या अशी मागणी संतप्त पालक जिल्हाधिकारी व विद्यालयाचा प्राचार्यांना करत आहेत . परंतु मुलांना रविवारी ताब्यात न देण्याचा निर्णयामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळाला .  आमचा मुलांना आमचा ताब्यात द्या , नवोदय विद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांकडे लक्ष देत  नाहीत ,सुविधा देत नाहीत असा आरोप पालकांनी केला  आहे .