स्व.दिलीप गांधी हे सामान्यातील असामान्य नेतृत्व : विनायकराव देशमुख

अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.विनायकराव देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अहमदनगर: ” माजी केंद्रीय मंत्री स्व.दिलीप गांधी हे सामान्यातील असामान्य नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने नगरच्या राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.” अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.विनायकराव देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी केंद्रीय मंत्री मा.खा. स्व.दिलीप गांधी यांची श्रध्दांजली सभा अहमदनगर बाजार समितीच्या सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.देशमुख बोलत होते.

Also see this and subscribe 

याप्रसंगी माजीमंत्री मा.आ.शिवाजीराव कर्डीले, महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, बाजार समिती अध्यक्ष अभिजित घिगे, यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या निर्बंधामुळे मर्यादित उपस्थितीत हि श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री.देशमुख म्हणाले , स्व.दिलीप गांधी  साहेबांनी पक्षीय मर्यांदांपलीकडे जाऊन मैत्रीचे नाते जपले.पक्षनिष्ठा कशी असावी, याचे स्व.गांधी हे आदर्श उदाहरण होते.विद्यमान खासदार असताना दोन वेळेस भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारली. पण त्यांनी अत्यंत संयमाने परिस्थितीला सामोरे जात पक्षाशी बांधीलकी जपली. नव्या पिढीला या गोष्टी मार्गदर्शक ठरतील. ८० च्या दशकात नगरसेवक पदापासून केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.”

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.