पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने

माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांना श्रध्दांजली

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन झाले असता, पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली. त्यांच्या निधनाने चळवळीतला नेता हरपल्याचे दु:ख होत असल्याची भावना स्वयंसेवी संघटनांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, माजी केंद्रीय राज्यमंत्री गांधी अहमदनगर जिल्हा दक्षिण लोकसभेचे खासदार राहिले. केंद्रात काम करताना जिल्ह्यातील अनेक प्रश्‍न सोडविण्याचे त्यांनी काम केले. पिपल्स हेल्पलाईन, जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला. काही दिवसांपुर्वीच त्यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन ही रेल्वे सेवा सुरु करण्याचे निवेदन दिले होते. ही रेल्वे सेवा मंजुर झाली असून, काही काळावधीत कार्यान्वीत होणार आहे. या कामाची मोहिम फत्ते करताना गड आला पण सिंह गेला ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

Also see this and subscribe

 

घरकुल वंचितांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी देखील त्यांचा पुढाकार राहिला आहे. लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना स्विकारण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. पिपल्स हेल्पलाईन,  निंबळक येथील घरकुल वंचितांच्या प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी म्हाडाच्या अधिकार्‍यांना देखील त्यांनी आनले होते. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची जाणीव असलेला चळवळीतला नेता हरपल्याचे त्यांनी सांगितले. अशोक सब्बन यांनी त्यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करुन, सर्व स्वयंसेवी संघटना त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हंटले.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.