पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज नगरमध्ये निदर्शने

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या झालेली निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. 10 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने  करणार आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सुरभाई शेख यांनी ही माहिती दिली. या आंदोलनामध्ये काळ्या फिती लावून जिल्ह्यातील पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी केले आहे.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी  शुक्रवारी (10 फेब्रुवारी)  नगरमध्ये निदर्शने होणार आहे.