पद्मश्री पोपटराव पवार यांचा चांद सुलताना हायस्कूलच्या वतीने सन्मान

द्मश्री पोपटराव पवार यांना पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आले त्याबद्दल चांद सुलताना हायस्कूल जुनियर कॉलेज च्या वतीने जिल्ह्याचे सुपुत्र पोपटराव पवार यांचा भव्य सनमान सोहळा शाळेच्या प्रांगणात करण्यात आला यावेळी चांद सुलताना हायस्कूलचे चेअरमन नजू पैलवान समवेत सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख, प्राचार्य शेख खलील, एस.जे. हुंडेकरी सर, इलियास तांबोली, फैज अहेमद, अँड. हनीफ बाबू आदीसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र पोपटराव पवार यांना नुकतेच भारत सरकारने पद्मश्री या पदाने सन्मानित केले पवार यांनी आपल्या कार्य व कर्तृत्वाने पद्मश्री या पदाने आपली विशेष ओळख प्राप्त केली आहे नुकतेच दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पदवी प्रदान करण्यात आली पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार या गावाचा आदर्श ग्रामपंचायत म्हणून सन्मान मिळवून दिला हिवरेबाजार मध्ये झालेल्या अनेक अशी कामे आहेत की ज्यांची दखल केवळ राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली प्रामुख्याने ग्रामस्वच्छता, निरोगी गाव, वृक्षरोपण आणि अति महत्वाचे म्हणजे जलसंधारणाचे काम हे व अशा अनेक कामाची दखल घेऊन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पवार यांना विविध संस्था तसेच शासकीय स्तरावर सन्मानित करण्यात आलेले आहे पोपटराव पवार यांनी पद्मश्री प्राप्त केल्यानंतर त्यांचे शहर जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र सत्कार होत आहे म्हणून चांद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अहमदनगर च्या वतीने त्यांचे सत्कार करण्यात आले.   पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की चांद सुलताना हायस्कूल ने मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले असून शिक्षणाने समाजाचा विकास साधला जातो या भावनेने चांद सुलताना हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी चांगले अभ्यास करून मिरीट मध्ये यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगले भविष्यात अधिकारी बनता येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली व विद्यार्थ्यांना हिवरेबाजार येथे येण्याचे निमंत्रण देखील देण्यात आले तर यावेळी संस्थेचे चेअरमन हाजी नजीर अहमद (नजू पैलवान) यांनी आपले मनोगत व्यक्त करून पवार यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच प्रास्ताविकात सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख यांनी पोपटराव पवार यांच्या संदर्भात विद्यार्थ्यांना विशेष माहिती देऊन त्यांच्या जिवन कार्याबद्दल स्पष्टीकरण केले व त्यांनी केलेल्या गावांमध्ये विविध कार्याबद्दल माहिती दिली तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  प्राचार्य शेख खलील यांनी मानले तर सूत्रसंचालन गुलणाज मॅडम यांनी केले.