पाथर्डी’त ‘पांगरमल’ची तयारी, पोलिसांचा छापा, बनावट दारू कारखान्यावर कारवाई

जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जांभळी गाव शिवारात एका ऊसाच्या शेतात बनावट दारू निर्मितीच्या ‘कारखान्या’वर प्रशासनाने धाड टाकली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.बनावट दारू म्हणजे एक प्रकारे विषच असून या प्रकारची दारू पिल्याचे परिणाम महाराष्ट्राने पाहिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातच पांगरमल दारू कांड राज्यभर कुप्रसिद्ध असून यात अटक आणि फरार असलेले आरोपी पाहाता अशा अवैध उद्योगात गुन्हेगारी प्रवृत्ती आणि त्याला मिळणारे राजकीय पाठबळ दिसून अनेक ठिकाणी येत असते.पाथर्डीच्या शिक्षक कोलिनीत पण यापूर्वी असाच बनावट दारू निर्मितीचा कारखाना आढळून आला होता. आता पाथर्डी तालुक्यातील जांभळी इथे बनावट अर्थात विषारी दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे प्रशासनाला कळल्याने या ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.उपलब्ध माहिती नुसार विविध नामांकित ब्रॅण्ड च्या नावावर या ऊसाच्या शेतात हा विषारी दारू निर्मितीचा उद्योग सुरू होता. हा उद्योग नेमका कोण करत होते किंवा याला काही राजकीय पाठबळ आहे का हे तपासात पुढे येणार आहे.