पाथर्डी अट्रॉसिटी कायदा संबधी जाणीव जागृती अभियान

पाथर्डी —तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शांती नगर येथे अट्रोसिटी कायद्या संबधी जाणीव जागृती अभियान कार्यक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.यावेळी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे,वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, अरविंद सोनटक्के,अँड विष्णुदास भोर्डे,पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, बाजीराव गर्जे, दिलीप कचरे,सरपंच सूरेखा बाजीराव गर्जे,उपसरपंच सुमन दिलीप कचरे,संजय कांबळे, सुहास कांबळे, बाळासाहेब गर्जे, अशोक कांबळे, हरिदास कांबळे, जितेश कांबळे, बबन ढगे,नंदू कांबळे, लतेश कांबळे ग्रामसेविका पी व्ही गायके उपस्थित होते.अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ या कायद्याची जनजागृती कार्यशाळा घेणारी तालुक्यातील पहिली पाडळी गावची ग्रामपंचायत आहे. 
यावेळी सचिन रणशेवरे ,गोकुळ दौंड ,प्रा किसन चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ( बाईट )
 
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजीराव गर्जे तर सूत्रसंचालन संजय कांबळे यांनी करून सुहास कांबळे यांनी आभार मानले.