पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करावा अन्यथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात निवास्थानी संगमनेर येथे बेमुदत उपोषण करणार – अरुण रोडे
पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करण्याचा मागणीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात निवास्थानी संगमनेर येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचं अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती चे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस महासंचालक मुंबई यांना निवेदन दिले आहे .
पोलीस महासंचालक मुंबई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पारनेर तालुक्यातील अवैध वाळु व्यवसाय बंद करण्यासाठी दि . १५/०१/२०२१ पासुन समितीच्या वतीने पत्रव्यवहार चालु असुन वाळु व्यवसायीकाशी अर्थपूर्ण संबंध मोठया प्रमाणात असल्याने अनेकवेळा उपोषण पत्रव्यवहार करुन अद्यापर्यंत कुठलीही कारवाई न करता अवैध वाळू व्यवसायाला जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक हे पाठबळ देत आहे . अर्थपुर्ण संबंधाची रक्कम मोठया प्रमाणात असल्याने हा व्यवसाय पुर्णतः बंद होऊ शकत नाही त्यामुळे सदर प्रकरणात राज्य स्तरीय कमिटी नेमुन कारवाई करण्यात यावी . अवैध वाळु व्यवसाय बंद करण्यासाठी सातत्याने पाठ पुरवा केल्याने महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी उपोषण करणार असल्याने पारेनर पोलीस स्टेशन तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे व वाळु व्यवसायीक एकत्र येत माझ्यावर बनावट खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
त्याचा समज गुन्हा दाखल केल्याने पाठपुरावा बंद होईल याबाबत अनेकवेळा धमक्याही आल्या , अनेक वेळा हल्ला झाल्याबाबत पोलीस संरक्षणाची मागणी पत्राद्वारे अनेकवेळा केली आहे पण सर्वसामान्य व्यक्तीला गुन्हा दाखल धमकी दिल्याने पाठपुरावा बंद होईल पण सर्वसामान्य व्यक्तीला गुन्हा धमकी याला न जुमानता पाठपुरावा चालु ठेवुन ज्योती देवरे यांच्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करुन कारवाई करुन बदली करण्यात आली परंतु त्यानंतर नवीन तहसिलदार आवळकंठे याची नियुक्ती करण्यात आली अशा होती आता तरी हा व्यवसाय बंद होईल परंतु आज अखेर अवैध वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालु असुन जिल्हाधिकारी अहमदनगर पोलीस अधिक्षक अहमदनगर याकडे दुर्लक्ष करुन धंद्यास पाठबळ देत आहेत . त्यामुळे पारनेर तालुक्यातील अवैध वाळु व्यवसाय पुर्णतः बंद होण्यासाठी राज्यस्तरीय कमिटी स्थापन करुन तालुक्यातील खराब झालेले रस्ते अनेक वाळु व्यवसायीका कडुन झालेले अपघात राष्ट्रीय पर्यावर्णास ( नुकसान ) याची संपुर्ण चौकशी होवून त्यास जबाबदार असणारे अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. संबंधीत अधिकारी कर्मचारी यांची अँटीकरप्शन ब्युरो मुंबई मार्फत चौकशी करुन कारवाही करण्यात यावी तसेच १ महिन्याच्या आत न झाल्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या महाराष्ट्र राज्य , यांच्या निवासस्थानी संगमनेर येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती चे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी निवेदनात म्हटले आहे .