पुण्यातील 23 गावांचं नशीब फळफळलं!
प्रत्येक गावाला 5 कोटींचा निधी – आता खऱ्या अर्थानं विकास होणार!

प्रत्येक गावाला 5 कोटींचा निधी – आता खऱ्या अर्थानं विकास होणार!
पुणे महापालिकेत काही वर्षांपूर्वी विलीन झालेली फुरसुंगी, उरुळी देवाची आणि आणखी २१ गावे आता त्यांच्या विकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे.
महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय:
या २३ गावांसाठी प्रत्येकी ₹५ कोटींचा निधी, म्हणजे एकूण ₹११५ कोटींचा विकासनिधी मंजूर!
कशासाठी वापर होणार हा निधी?
- रस्ते व गटार व्यवस्था
- पाणीपुरवठा
- कचरा व्यवस्थापन
- इतर मूलभूत सोयी
यामुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या भागांमध्ये खऱ्या अर्थानं विकासाच्या गतीला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही गावे आता स्वतंत्र नगरपरिषद म्हणून कार्यरत आहेत.
बैठकीत कोण होते?
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- खासदार मेधा कुलकर्णी
- वरिष्ठ प्रशासन अधिकारी, नगरविकास सचिव, जिल्हाधिकारी इ.
महत्त्वाचे निर्णय:
- आंबेगाव बुद्रुकमधील कचरा डेपो समस्या – शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया व गांडूळखत निर्मिती
- जांभूळवाडी तलाव – पाण्यासाठी वापर, पण गुणवत्ता तपासून
- मालमत्ता कर माफ करण्याची योजना
- 626 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची शक्यता