बंगल्यात प्लंबर म्हणून आले अन लाखो लुटून नेले
श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे भरदिवसा एका बंगल्यात चोरटे प्लंबर म्हणून आले आणि त्यांनी तेरा ते चौदा तोळे सोने, चांदी, तीस हजारांची रोकड असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी बाभळेश्वर औट पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.