गुटखा विक्रेत्यांवर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहुरी खुर्द येथे नगर – मनमाड रोडवर पवन ट्रेडर्स दुकानामध्ये इसम नामे पृथ्वीराज उर्फ पवन गिरासे राहुरी खुर्द हा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला तसेच शरीरास अपायकारक होईल असा सुंगधी मिश्रीत पानमसाला गुटखाची विक्री करीत आहे अता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती मिळालेल्या माहिती नुसार खात्री करून कारवाई करणे बाबत तात्काळ
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश मोरे ,पोलीस नाईक लक्ष्मण खोकले ,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट , पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव यांचे पथक तयार करून त्यांना सूचना केल्या अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक वरील नमुद पोलीस स्टाफ राहूरी पोलीस स्टेशन ये खाजगी वाहनाने बातमीतील नमुद ठिकाणी राहूरी खुर्द नगर – मनमाड रोडवर पवन ट्रेडर्स दुकानामध्ये जा खात्री केली असता एक इसम हा गुटखाची विक्री करतांना दिसला. दिनांक २१/१२ / २०२१ रोजी ०८/०० वा . चे सुमारास अचानक छापा टाकुन सदर इसमास ताब्यात घेतले त्यास नाव गाव विचारले प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारले असता त्याने त्याचे नाव १ ) प्रशांत देव गिरासे वय २१ वर्षे रा . टाकरखेडा ता . सिंदखेडा जिल्हा धुळे सध्या रा . राहूरी खुर्द ता . राहूरी जि . अहमदनगर अ सांगीतले व सदर पवन ट्रेडर्स दुकानाचा मालक नामे २ ) पृथ्वीराज उर्फ पवन दगडूसिंग गिरासे रा . राहूरी खुर्द ता ( फरार ) असे असलेचे सांगितले व सदर धंद्या त्याच्या आर्थीक फायद्याकरीता घेतो दिल्यानंतर तो बसल्या ठिकाणची झडती घेतली असता त्याचे कब्जात गुटखा , पानमसाला मिळुन आला तो
एकूण १,०१,५८७ / -रुपये प्रमाणे वरील वर्णनाची व किमतीची पानमसाला , गुटखा , सुंगधी तंबाखु इसम नामे प्रशांत देविसिंग गिरासे वय २१ वर्षे रा . टाकरखेडा ता . सिंदखेडा जिल्हा धुळे सध्या राहूरी खुर्द ता . राहूरी जि . अहमदनगर याचे कब्जात मिळुन आल्याने जप्त मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे . तरी दिनांक २१/१२/२०२१ रोजी ०८/०० वा . इसम नामे प्रशांत देविसिंग गिरासे वय २१ वर्षे रा . टाकरखेडा ता . सिंदखेडा जिल्हा धुळे सध्या रा . राहूरी खुर्द ता . राहूरी जि . अहमदनगर हा राहूरी खुर्द नगर मनमाड रोडवर पवन ट्रेडर्स दुकानामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध सुगंधी तंबाखु मिश्रीत गुटखा , पानमसाला मानवी शरीरास अपायकारक , मूर्च्छाकारक , नशाकारक किंवा अपथ्यकारक आहे असे माहित असतांना सुध्दा असा आंमली खादय पदार्थाची विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आला आहे इसम नामे १ ) प्रशांत देविसिंग गिरासे वय २१ वर्षे रा . टाकरखेडा ता . सिंदखेडा जिल्हा धुळे सध्या रा . राहूरी खुर्द ता . राहूरी जि . अहमदनगर २ ) पृथ्वीराज उर्फ पवन दगडूसिंग गिरासे रा . राहूरी खुर्द ता . राहूरी जिल्हा अहमदनगर ( फरार ) त्याचे विरुध्द भा.द.वि. कलम १८८ , २७२ , २७३ , ३२८ प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव यांनी फिर्याद आहे .
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश मोरे ,पोलीस नाईक लक्ष्मण खोकले ,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट , पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव, राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल एकनाथ आव्हाड या पथकाने ही कारवाई केली आहे
पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे करत आहेत.