बनावट दिव्यांग प्रमाणपत्र चा वापर करणाऱ्या आरोपींना अटक करून दलालाचा शोध घेण्याची मागणी.
बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्या आरोपींना अटक करून दलालाचा शोध घेण्याच्या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष ॲड.लक्ष्मणराव पोकळे समवेत जिल्हा सचिव हमीद शेख, किशोर सूर्यवंशी, संजय पुंड, संदेश रपारिया, विजय हजारे आदीसह दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते.
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरून दिव्यांग व्यक्तींसाठी असणारा लाभ घेण्याचा प्रकरणा बाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी फसवेगिरी करणाऱ्या चार व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेले विक्रम राठी, विश्वनाथ फाळके, महेश मते, सुनील पवार यांच्याकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आढळून आलेले आहेत या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांनी बनावट अपंग प्रमाणपत्र कोणाकडून बनवून घेतले त्या दलालाचा एजंटाचा शोध घेणेदेखील आवश्यक आहे या दलालाचा शोध घेतला तर अशाच प्रकारे दिव्यांग प्रमाणपत्र किती लोकांना देण्यात आले व हे लोक शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहेत किंवा नाही हे देखील उघड होईल तसेच बनावट अपंग प्रमाणपत्र धारक शिक्षक यांच्यावर जिल्हा परिषदेने मागे गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये देखील अनेक दलालांना पकडण्यात आले होते यामध्ये देखील अनेक दलाल पकडले जाऊ शकतात तरी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यामागील एजंट दलाल यांना देखील अटक करण्यात यावी व या विषयासंदर्भात सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.