अहमदनगर कॅन्टोन्मेंट हद्दीत व्हेईकल एन्ट्री फी आकारली जात नसून व्हेईकल एन्ट्री टॅक्स आकारण्यात येतो

पुणे, खडकी आणि देहू रोड कॅन्टोन्मेंटसह देशातील सर्व कॅन्टोन्मेंट हद्दीतून प्रवास करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून आकारण्यात येत असलेले वाहन प्रवेश शुल्क (व्हेईकल एन्ट्री फी) बंद करण्याच्या सूचना संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाने सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिल्या आहेत. तथापि अहमदनगर कॅन्टोन्मेंट हद्दीत व्हेईकल एन्ट्री फी आकारली जात नसून वाहन प्रवेश कर (व्हेईकल एन्ट्री टॅक्स) आकारण्यात येत आहे. त्यामुळे तुर्तास तरी वाहन प्रवेश कर बंद करण्याच्या कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण अहमदनगर(भिंगार) कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी दिले आहे. संरक्षण मालमत्ता विभागाचे सहाय्यक महासंचालक दमनसिंग यांनी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला आणि संरक्षण मालमत्ता विभागाच्या पुणे प्रधान संचालक अहमदनगर कॅन्टोन्मेंट हद्दीत, वाहन प्रवेश कर आकारणी सुरुच राहणार असलेली माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी व वानकर वसुली ठेकेदार यांनी माहिती दिली