भिंगार येथे आरपीआयच्या वतीने संविधान दिन साजरा

सर्व राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

भिंगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वतीने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन, संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.
महात्मा गांधी रोड येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष शामराव वागस्कर, रिजवान शेख, भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी दहीहंडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष किशोर कटोरे, प्रकाश लुनिया, शहापूर केकतीचे सरपंच देवराज भालसिंग, उपसरपंच प्रकाश घोरपडे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोर्‍हाडे, गोपनीय विभागाचे सचिन धोंडे उपस्थित होते.


भिंगार भाजपचे शहराध्यक्ष वसंत राठोड यांची कॅन्टोमेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर विशाल बेलपवार यांची चर्मकार महासंघाच्या महानगर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांना संविधान उद्देशिकाच्या प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले. आरपीआय आयटी सेलचे संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, नगर तालुका महिलाध्यक्षा कविता नेटके, महादेव भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, दया गजभिये, आकाश बडेकर, आशिष भिंगारदिवे, गौतम कांबळे, अजय पाखरे, तुषार धावडे, विशाल कदम, निखिल सूर्यवंशी, अक्षय गायकवाड, संदीप सकट, गोरख अंबरीत, बाळासाहेब नेटके, विक्रम चव्हाण, अशोक भोसले, अशोक भिंगारदिवे, पोपट नेटके, महेश भिंगारदिवे, संतोष हजारे, लक्ष्मीकांत तिवारी, सलीम शेख, बबन कानडे, रुपेश पाटोळे, संदीप थोरात यावेळी उपस्थित होते.


अमित काळे म्हणाले की, घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. संविधान एका समाजापुरता मर्यादित नसून सर्व भारतीयांचा आहे. संविधानाने देशात समता, बंधुता व स्वतंत्र्यता प्रस्थापित झाली. संविधानाला यावर्षी 72 वर्षे पुर्ण होत असून, देशाला एकसंघ ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही संविधानाने जिवंत आहे. संविधान हा देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून, देशाचे अखंडत्व संविधानामुळे टिकून असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान दिनानिमित्त आरपीआयच्या वतीने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रमाचे सहावे वर्ष होते. तसेच यावेळी मुंबई येथे झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.