भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी मंजूर.
भुईकोट किल्ल्याला देशामध्ये एक ऐतिहासिक महत्त्व आहे.अशा ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे आपले प्रथम कर्तव्य लागते. यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी भुईकोट किल्ला सुशोभिकरण करण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 90 लाखाचा पहिला हप्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्त झाला असल्याची माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली.