अहमदनगर नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचा उदघाटन सोहळा संपन्न .

अहमदनगरच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उदघाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख अहमदनगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले पाटील, खा.सदाशिव लोखंडे,आ डॉ.सुधीर तांबे आ.बबनराव पाचपुते,आ.लहू कानडे जिल्हापरिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी श्री राजेंद्र भोसले पद्मश्री पोपटराव पवार पद्मश्री राहीबाई पोपरे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर तसेच बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता,यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांच्यासह इतर मान्यवरांनी नूतन इमारतीची पाहणी केली.अहमदनगर मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय,आरटीओ कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा न्यायालय, आशा सर्व कार्यालय नूतन वास्तूत स्थलांतरित झाल्या होत्या मात्र जिल्हाधिकारी कार्यालय अनेक वर्षांपासून जुन्या वास्तुस होते मात्र आता नूतन कार्यालयात स्थलांतरीत होत आहे.

या उदघाटन प्रसंगी बोलताना राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की राज्या मध्ये एक अतिशय सुंदर कलेक्टर ऑफिसचे उद्घाटन आज आपण केलेले आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार होते मात्र  मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री आजारी पडल्यामुळे ते येऊ शकले नाहीत.नूतन इमारत अतिशय सुसज्ज चांगली बांधलेली आहे. त्यामुळे माझी विनंती असणार आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत इतर सरकारी कार्यालयांना देण्यात यावी अशी मागणी त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे केली.या नूतन इमारती मधून जनतेचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे आणि जलदगतीने व्हावे आशा सदिच्छा व्यक्त केली.