अहमदनगर – शहरातील सावेडी परिसरातील प्लॉटचे शासकीय रेखांकन करून बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागणी करण्यासाठी 40 हजारांची लाज मागितल्याचा आरोपावरून तलाठी सागर एकनाथ भापकर आणि मंडलाधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते या दोघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या नावे सावेडी भागात 18 हजार चौरस फूट फुटांचा प्लॉट असुन, तक्रारदार यांना शासकीय रेखांकन करून सदर प्लॉटचे बांधकाम करण्याकरता सावेडीचे तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कामासाठी अडवणूक होत होती त्यामुळे तक्रारदार यांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक, बाबासाहेब कराड, हरून शेख यांनी 19 मार्च 2024 रोजी सापळा लावला होता. उपविभागनी करण्याच्या बदल्यामध्ये तलाठी भापकर यांनी पंचांसमोर तक्रारदार यांच्याकडे 44 हजारांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तडजोड करून तडजोडी अंती 40 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी मंडलाधिकारी शैलजा देवकाते यांनी दर्शवली. तक्रारदार यांच्याकडून फेरफार नोंदी मंजूर करण्याची लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून तलाठी भापकर यांच्यासाठी ११ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठांना अहवाल पाठवला असता, त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले, त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलजा देवकाते यापूर्वी नालेगाव येथे मंडलाधिकारी असता, त्यावेळी त्यांच्यावर वाळू व्यावसायिकाकडून लाच घेतल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला होता.
Next Post