महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचारी संघटने चा वतीने बेमुदत काम बंद आंदोलन .
महाराष्ट्र राज्य महाविदयालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीचा निर्देशानुसार न्यू आर्ट्स ,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर चा शिक्षकेतर कर्मचारी संघटना चा वतीने विविध प्रलंबित मागणीसाठी दि १८ डिसेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत .या संघटनेचा विविध मागण्या असून त्या पूर्ण होईपर्यंत संघटनेच्यावतीने बेमुदत काम आंदोलन चालणार आहे .
या संघटनेचा काही प्रमुख मागण्या आहेत , सातव्या वेतन आयोगाचा ५८ महिन्याची थकबाकी त्वरित अदा करावी , सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेल्या शासन निर्णय पुनर्जिवित करण्यात यावा . १०-२०-३० वर्षाचा सेवे नंतरची तीन लाभांची योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी . शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करावा . तसेच अकृषी विद्यापीठामधील उर्वरित ७९६ पदांचा सातवा वेतन आयोगाचा सुधारित वेतन संरचनेचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा . शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन नियुक्ती करण्यात यावी . शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे . २००५ नंतर सेवेत दाखल शिक्षकेतर कर्मचारी याना जुनी पेंशन योजना लागू करावी . अशा महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचारी संघटने चा वतीने मागण्या असून त्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन चालणार आहे .