अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन.

अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे २० वर्षाखालील संघ निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सहाय्यक फौजदार देवराम ढगे यांनी बुद्धिबळ पटावर चाल चालून केले .यावेळी पालक बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष संजय पांढरकर, अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारूनाथ ढोकळे, पंच मनीष जसवानी, देवेंद्र ढोकळे, देवेंद्र वैद्य, अविनाश कांबळे आदीसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे २० वर्षाखालील संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे प्रमुक पाहुण्यांचे स्वागत पारुनाथ ढोकळे यांनी केले तर प्रमुख पाहुणे देवराम ढगे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट म्हणाले की कोरोना मुळे बुद्धिबळ स्पर्धा ही ऑनलाईन चालू होती आता कोरोनाचे प्रादुर्भाव संपत आल्याने अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने खिस्त गल्ली येथील सप्तक सदन मंगल कार्यालय येथे बोर्डवर ही स्पर्धा घेण्यात आली या मधून ४ मुले व ४ मुली निवडून जळगाव येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे तसेच जानेवारी महिन्यात 20 ते 23 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विविध स्पर्धेचे व बुद्धिबळ प्रशिक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांचे नेहमीच सहकार्य असते तसेच पुढील रविवारी सप्तक सदन खिस्त गल्ली येथे 16 वर्षा खालील मुला-मुलींची निवड चाचणी स्पर्धा होणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले तसेच खेळाडूंनी मास्क, सैनीटायझर व सोशल डिस्टनचे नियम पाळून स्पर्धा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारूनाथ ढोकळे यांनी केले तर आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले.