महेश कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार

नगर येथील पत्रकार व प्रेस फोटोग्राफर महेश कांबळे याना आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे जयंती व राष्ट्रीय पत्रकार दिनाचे  औचित्य साधून ऍक्टिव्ह मराठी परिवाराच्या वतीने माळीवाडा येथे आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी महापौर रोहिणी शेंडगे , मनीष साठे , पोपटराव साठे , मधुकर रावजी पठारे साहेबराव पाचरणे , विजय वडागळे ,ना म साठे , नामदेव चांदणे , जालिंदर उल्हारे , ऍक्टिव्ह मराठीचे संचालक उमेश साठे व जालिंदर उल्हारे आदी मान्यवर मोठ्या संख्नेने उपस्थित होते.
महेश कांबळे हे गेली २५ वर्षे पत्रकारिता करत असून त्याना दा प आपटे पत्रकारिता पुरस्कार , पुणे महानगरपालिका , दै सामना , दै लोकसत्ता , संकेत अकॅडमी , पुणे , यांचे पुरस्कार मिळालेले आहेत तसेच  ते मनपाचे वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य असून जागतिक साळी फाऊंडेशन व बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आहेत , प्रतिबिब संस्थेचे सचिव असून लक्ष्मीनारायण शाळेचे माजी सचिव आहेत. त्यांनी काढलेले प्रेस फोटो व लेख मराठी , हिंदी , इंग्रजी दैनिकात प्रकाशित झाले असून अहमदनगर प्रेस फोटोग्राफर्स असो दरवर्षी फोटो प्रदर्शन मध्ये त्याचे फोटो सहभागी असत , त्यांनी आचार्य आनंदऋषी महानिर्वाणचे तसेच फोटो प्रदर्शन व फोटो क्लबच्या वतीने नगरमध्ये फोटो प्रदर्शन भरवलेले होते पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे अनेकांनी अभिनंदन केले आहे