अकोले तालुक्याच्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री तर अन्नमाता ममताबाई भांगरे यांना केंद्रीय कृषी मंत्रालयाचा पुरस्कार मिळाले बद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने सन्मान करण्यात आला.

बीजमाता राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री तर अन्नमाता ममताबाई भांगरे यांना केंद्रीय कृषी मंत्रालयाचा पुरस्कार मिळाले बद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने सन्मान

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, मराठवाडा संपर्कप्रमुख कुंडलिक वाळेकर, अकोले तालुका उपाध्यक्ष सचिन लगड, सोमनाथ पोपेरे यांचे उपस्थिती मध्ये आयोजित करण्यात आला होता.
      कोंभाळणे येथे राहीबाई पोपेरे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी सौ पोपेरे यांनी पद्मश्री  सन्मान माझा नसून हा काळ्या मातीचा अन देशी बी बियाण्याचा आहे. समाजाने देशी वाण वापरून नैसर्गिक पध्दतीने शेती करावी, सेंद्रिय शेती करावी. पत्रकारांनी बातमी करताना सकारात्मक विचार मांडावे. देशी बी बियाणे आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार करावा, चंद्रकांत दादा पाटील ही बीज बँक बनवली. ती गळत नसताना काही पत्रकार यांनी चुकीची माहिती दिली. पत्रकार संघाने माझा पुण्यातही माझा सन्मान केला होता. आज पुन्हा घरी येऊन सत्कार केला हे ऋण विसरणे सारखे नाही असेही मत व्यक्त केले.
          देवगाव येथे सौ ममताबाई भांगरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी पंस सदस्य मुरलीधर भांगरे, सरपंच सचिन भांगरे, क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे वंशज धोंडिबा भांगरे, आंबेवंगण चे सरपंच, लाडगाव चे उपसरपंच ,टिटवी चे पोलीस पाटील , देवराम भांगरे आदी उपस्थित होते.
          सौ भांगरे यांनी पुरस्कार बाबद सांगितले की,  कृषी मंत्रालय भारत सरकार संचलित प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटिज अँड फार्मर्स राइट्स अथॉरिटी मार्फत पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी व्यक्तिगत पातळीवर दिला जाणारा “प्लांट जीनोम सेव्हीयर फार्मर रिवॉर्ड” (2017-18 ) हा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा मानाचा पुरस्कार अन्नमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममताबाई देवराम भांगरे यांना मिळाला. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात भारताचे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दीड लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
        यावेळी बोलताना ममताबाई भांगरे म्हणाले मागील दोन पिढ्या  स्थानिक बियाणे संवर्धन आणि वृद्धी यासाठी भरीव कार्य केलेले आहे. देशपातळीवर योग्य दखल घेतली गेली.  भात पिकाच्या विविध वाणाचे संरक्षण केले आहे तसेच लाल रंगाचा लसूण, लांब व आरोग्यास पोषक असलेले दुधीभोपळा, डांगर भोपळा, मोहरी, भुईमूग, मका, तसेच विविध प्रकारचे परसबागेत लागवड योग्य भाजीपाला पिके, तेलबिया, डाळवर्गीय पिके यांच्या पारंपरिक वाणांचे संवर्धन केले आहे. ज्वारी चे सात प्रकारचे वाण संवर्धन करीत असून यांची माहीती जागतिक पातळीवर पोहचले असून यामध्ये बायफ चे मोठे योगदान आहे.