मुलाचा खुनाच्या आरोपीना अटक करण्यासाठी पित्याने केले सह कुटुंबासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण .

संघटितपणे हल्ला करून मुलाचा खून केलेल्या आरोपीना अटक करण्यास पोलिसांकडून होत असलेल्या टाळाटाळीमुळे  पित्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे.
           नगर तालुक्यातील वाळकी गावात लहान मुलाने घरासमोर सायकल लावण्याचा किरकोळ कारणातून घरातून ओढून भरदिवसा संघटितपणे बाजारपेठेत पाठलाग करत दगड विटा व पाइपाने मारहाण करत पाठीत दगड टाकून हल्ला केला या प्रकरणी जावेद गणी तांबोळी (वय ४०) याचा आनंदऋषी हॉस्पिटल मध्ये उपचार दरम्यान  मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये एकूण ११ आरोपी असून तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत .पोलिसांकडे आरोपी विरोधात सी सी टीव्ही फुटेज व इतर सबळ पुरावे असून  या प्रकरणामध्ये आरोपीना पोलिसांकडून अटक करण्यास होत  असलेल्या टाळाटाळी मुळे मयत जावेद तांबोळी यांचे पिता गणी इब्राहिम तांबोळी व सह कुटुंबासोबत जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण  करत आहेत . 

         या प्रकरणामध्ये फिर्यादीचा कुटुंबाना आरोपींकडून दमदाटी करून नातेवाइकांचा समोर धमकी वजा बोलून मारहाण करण्याचा प्रयन्त केला जात आहे . तसेच साक्षीदारांना आरोपींकडून धमकावण्याचा प्रयन्त केला जात असून मी व माझे कुटुंब प्रचंड दहशतीमध्ये आहे , माझा एक मुलगा अपंग असून आरोपीना अटक करण्यात यावी व गुन्हाचा तपास  नगर तालुक्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण साहेब (स पो नि ) चौकशी तपास अधिकारी यांचा कडून काढून घेऊन दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे देण्यात यावा  अशी मागणी मयत जावेद तांबोळी यांचा वडिलांनी केली आहे .