मोटारसायकल चोरी करणारी चौघांची टोळी जेरबंद
अहमदनगर —शहरातील मोटार सायकलींची चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे . शुभम बबन भापकर (रा .गुंडेगाव ), कृष्ण बाबासाहेब गुंड (वय २५ ), अभिषेक संतोष खाकाळ व जालिंदर अर्जुन आमले (सर्व अरणगाव) असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचे नावे आहेत . आरोपींकडून चार मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत . हि कारवाई कोतवाली पोलिसांनी केली .
२४ जानेवारी २०२२ रोजी मोमीन तसदीक मोमीन इद्रिस , याची होंडा कंपनीची मोटार सायकल शनी चौकातील भोला जिम जवळून चोरटयांनी चोरून नेली होती . या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता , कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सदरील आरोपींवर गुन्हयाचा संशयाची सुई गेली . कोतवाली पोलिसांनी कायनेटिक चौकात नियोजित सापळा रचला . दोन मोटार सायकल वरून चार इसम आले . त्यानं ताब्यात घेण्यात आले . शुभम बबन भापकर , कृष्ण गुंड , अभिषेक संतोष खाकाळ ,व जालिंदर अर्जुन आमले यांच्याकडे कसून चौकशी केली . त्यानंतर त्यांनी शहरातून चार मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली . आरोपींना कोर्टात उभे केले असता त्यांना २८ जानेवारी पर्यंत कोठडी देण्यात आली आहे . दरम्यान आरोपींकडून चार मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत .
पोलीस अधीक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी . संपत शिंदे ,पोना योगेश भिंगारदिवे , गणेश धोत्रे , योगेश कवाटे , नितीन शिंदे , सलीम शेख , अभय कदम , दीपक रोहकले , अमोल गाडे , सोमनाथ राऊत , अतुल काजळे , राहुल गुंड , प्रशांत राठोड , यांचा पथकाने हि कारवाई केली .