ओमायक्रोन ची लागण झालेल्या रुग्नाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक माहिती माध्यमांना दिली आहे.
तशा आजाराची लागण झालेले १००० पेक्षा जास्त रुग्ण मुंबई विमानतळावर उतरल्याचे खुलासा पवार यांनी केला आहे. हा रोग घेऊन जगभरातून आलेले १००० रुग्ण मुंबई विमातळावर उतरले. आणि ते आजूबाजूच्या भागात पसरले. आता त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मुंबई तसेच इतर महापालिकांच्या आयुक्तांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत असे त्यांनी म्हंटले आहे.
कालपर्यंत राज्यात ओमायक्रोन ची लागण झालेला किंवा तशी लक्षणे असलेला एकही रुग्ण नाही असा स्पष्ट खुलासा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला होता. पण आता अजित पवार यांनी ही माहिती दिल्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. जगाच्या विविध भागातून मुंबई विमानतळावर उतरलेल्या या १००० रुग्णांना क्वारंटाईन करण्याचे काम राज्य सरकाने हाती घेतले आहे.
त्याचा शोध घेण्यात येत आहे. हे रुग्ण ज्या ज्या भागात पोहोचले तेथे ही त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात हे काम करण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पस्ट केले आहे.