राहता — तालुक्यातील बारावीला असलेले दोन विद्धयार्थी बेपप्त झाले आहेत ,शाळेत जातो असे सांगून कोऱ्हाळे येथील एका महाविद्यालयातील बारावीचा विद्धयार्थी ओम विजय देशमुख (वय १७ ) घराबाहेर पडला ,गुरुवारी दुसऱ्या महाविद्यालयातील निखिल संजय तस्कर (रा .कोऱ्हाळे वय १७ )हा बारावीचा विद्धयार्थी बेपत्ता झाला आहे . तालुक्यातील दोन विद्धयार्थी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे . ओम देशमुख या विद्धयार्थ्यांचे वडील विजय केशवराव देशमुख हे रुई येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत , त्यांनी राहता पोलीस ठाण्यात विध्यर्थ्याला पळून नेणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे . सादर तपासात पोलीस कॉन्स्टेबल दिलीप तुपे व पंकज व्यवहारे यांनी सुरुवात केली आहे . निखिल तासकर हा विद्धयार्थी घरी आला होता ,त्याचा मोबाइल व चप्पल आज हि घरी आहे . , माझा मुलगा घरातून पळून गेला नसून त्याला अज्ञात व्यक्तींनी पळून नेले असल्याची माहिती विद्यार्थ्यांचे वडील संजय उमाजी तासकर यांनी दिली .
Prev Post