राहुरीत दोन जुळ्या मुलींचे अपहरण
राहुरी– तालुक्यातील राहुरी खुर्द येथील दोन जुळ्या बहिणींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळून नेल्याची घटना घडली आहे . यामध्ये राहुरी पोलीस ठाण्यात त्या मुलींच्या वडिलांनी भादवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय . तर एक मुलगी पोलिसांना शोधण्यामध्ये यश आले असून तिस आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे . तर दुसरी मुलीचा अद्याप शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे .