बुलढाणा : खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे १७ फेब्रुवारीला पहाटे घडलेल्या घटनेत आई वडिलांना बहिणीच्या पाठचा एकच मुलगा , घरी चार एकर शेती , शेतकरी म्हणून कष्ट उपसण्याची त्याची तैयारी जेमतेम परिस्थिती असल्याने घरची शेती करून बटईने शेती करायचा तरीही लग्न जुळत नव्हते , नकारात्मक विचाराने तो खिन्न झाला ,अखेर जीवनाचा शेवट करण्याचा निर्धार २८ वर्षीय मेहनती युवा शेतकऱ्याने स्वतः च सरण रचले आणि पेट्रोल ओतून चिता पेटवून देत त्यात उडी घेतली . यात देह होरपळून त्याचा मृत्यू झाला या घटनेने जिल्हा वासियांचे हृदय पिळवटून गेले आहे . महेंद्र नामदेव बेलसरे (वय २८) असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे .
तालुक्यातील पळशी खुर्द येथील रहिवासी असलेले नामदेव बेलसरे यांना एक मुलगी व एक मुलगा आहे . वडील नामदेव यांच्या नावावर असलेली ४ एकर शेती महेंद्र करत होता . या शेतीत उत्पन्न घेण्यासोबतच त्याने शेजारील काही शेतकऱ्यांची शेती बटईने केली होती . दरम्यान , लग्न जुळत नसल्याने तो नैराश्यात होता . १७ फेब्रुवारीला पहाटे महेंद्र बेलसरेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत गावाशेजारील विहिरीजवळ आढळला . याबाबत धनंजय शेंडे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . लग्न जुळत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन त्याने सरण रचले . पेट्रोल ओतून चिता पेटवून देत त्यात उडी घेतली . यात त्याचा होरपळून मृत्यू झाला .