लता दीदी गेल्या नाही आजही जनमानसांच्या मनात जिवंत

पृथ्वीवरील स्वर्गीय आवाज असलेल्या लतादीदी या सरस्वतीचा अवतार होत्या. लतादीदींचा आवाज व गाणे ऐकून अनेक जण आजारातून किंवा दुःखातून बाहेर पडलेले आम्ही पाहिले आहेत. 91 व्या वर्षी न्यूमोनिया आणि व नंतर 93 व्या वर्षी कोरोना झाला, त्यावेळी दीदींच्या सहनशक्तीची कमाल आम्ही पाहिली. वसंत पंचमीला सरस्वती पूजनानंतर होणाऱ्या सरस्वती विसर्जनाच्या दिवशी दीदीने देह ठेवला. हा मोठा चमत्कार म्हणावा लागेल. याचा अर्थ लतादीदी सरस्वतीचा अवतार होत्या. दीदीचे अस्तित्व अजूनही आमच्या घरात असल्याचे वाटते. त्यामुळे आम्ही अजूनही मानतो, की दीदी गेलेली नाही. आजही ती जनमानसांच्या मनात जिवंत आहेच. अशा शब्दात ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी भावना व्यक्त केल्या. नगर शहराच्या 533 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुहास मुळे निर्मित व दिग्दर्शित मंच आहे. ‘मन चाहे गीत’ हा म्युझिकल स्टार नाईट कार्यक्रम झाला. ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे आमदार संग्राम जगताप यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुहास मुळे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत उषा मंगेशकर यांनी स्व. लतादीदींचा व पूर्ण मंगेशकर कुटुंबीयांचा जीवनपट उलगडला. या कार्यक्रमात नगर मधील 14 उदयोन्मुख गायक आणि स्वर्गीय लतादीदी व इतरांची गाणी सादर केली उषा मंगेशकर म्हणाल्या, आम्ही चौघे भावंडे मात्र सर्वांचा आवाज वेगळा आहे. लतादीदी सारखा आवाज गायके ठेवण आमच्यात नाही. अत्यंत दयाळू दानशूर प्रेमळ व लहान मुलांवर व मुक्या प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या लतादीदीने स्वतःसाठी कधीही खर्च न करता, कोणालाही न सांगता देशासाठी व गरजूंना अनेकदा मोठमोठी मदत केली. छत्रपती शिवाजी महाराज दीदीचे दैवत होते. त्या स्वतःला ‘शिवदासी’ म्हणून घेत दीदीची व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनेकदा भेट झाली. त्या काळात सावरकरांबरोबर वंचितांच्या पंक्तीत बसून लतादीदीने जेवण केले होते.