व्यायाम शाळेसाठी निधी द्यावा युवासेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय कातोरे यांची खा.सुजय विखे यांच्याकडे मागणी

     नगर – बोल्हेगांव-नागापुर भागात सार्वजनिक व्यायाम शाळेसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय कातोरे यांनी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र.7 मधील बोल्हेगांव व नागापूर या दोन गावांचा समावेश होतो. गेल्या 15 वर्षांपासून या भागातील लोकवसाहती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या दोन्ही गावातील जुन्या व्यायामशाळांचा र्‍हास झाला आहे. युवकांना व्यायामा करता कुठल्याही प्रकारची सार्वजनिक व्यायामशाळा  या भागात राहिलेली नाही. युवकांच्या आरोग्याचा हेतू लक्षात घेता या भागासाठी सार्वजनिक व्यायामशाळेसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. जेणे करुन युवकांची मोठी सोय होईल, असे निवेदनात म्हटले आहे. या परिसरातील अनेक सर्वसामान्य घरातील युवक पीएसआय, पोलिस सारख्या स्पर्धा परिक्षा देत आहेत, त्यासाठी व्यायाम हा महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, व्यसनापासून दूर रहावे, यासाठी व्यायाम शाळेची नितांत गरज असल्याचे अक्षय कातोरे यांनी म्हटले आहे.