शहरात एलईडी च्या प्रकाशाची वाट मोकळी
अहमदनगर ( दि,१९)– महापालिकेचा क्षेत्रात पथ दिवे बसण्यावरून गेल्या महिन्यात वादंग झाले ठेकेदाराने कमी वॉट चे दिवे बसवल्याने आरोप नगर सेवकांनी केला होता . चिमणी सारखा प्रकाश अशी खिल्ली हि काही जणांनी उडवली होती . चांगली खलबते झाल्यानंतर अखेर या वादावर पडसाद पडला .काम सुरळीत चालू झाले आहे . शहरात आता पर्यंत ११ हजार एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत ठरलेल्या तीन महिन्यात म्हणजे ५ फेब्रुवारी पर्यंत २८ हजार दिवे बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे . त्यामुळे आता तरी नागरिकांचा दारात लक्ख प्रकाश पडेल अशी अशा आहे .
शहरातील बहुतेक उपनगरांमध्ये विजेचा खांबावरील दिवे खराब झाले परंतु गेल्या दोन वर्षांपासून ती दुरुस्ती केली जात नव्हती , एलईडी बसवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता . त्यानुसार निविदा निघाल्या . दोन ठेकेदारांनी निविदा भरल्या परंतु त्या वादग्रस्त ठरल्या हा वाद न्यायालयात गेला . वादात दिवे अडकले , तर पुढील दोन तीन वर्ष शहराला अंधारात राहावे लागेल हे ओळखून आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी केली आणि एक निविदा समंत झाली . त्यानुसार दिवे लावण्याचा मुहूर्त मिळाला .
शहरात दिव्यांचा लक्ख प्रकाश पडायला हवा या साठी त्यासाठी ३० ते ६० वॉट चे दिवे हवे आहेत, मात्र संबंधित ठेकेदार १५ ते १८ वॉट चे दिवे बसवतात . यामुळे याची प्रशासनाने दाखल घ्यावी . पाइप लाइन वरील रस्त्यात कमी वॉट चे दिवे बसवल्याने हे काम बंद पडले होते . अधिकारी मात्र या मताला फाटा देत होते . आवश्यकतेनुसार किती प्रकाश पडावा याबाबत मोजमाप झाले . तसे निविदेत ठरले आहे . त्यामुळे वादात काही अर्थ नाही पूर्वीचा दिव्यां इतका प्रकाश नवीन दिवे देणार आहेत .