शिलाविहारला गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार पासून भागवत कथा
नगर – सावेडी उपनगरात शिलाविहार येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार दि.26 जून पासून अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद् भागवत कथा आयोजित केली असून, भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सुंदरदास रिंगणे देवा यांनी केले आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रोज पहाटे 5 ते 7 रुद्राभिषेक, 9 ते 11 श्री चे ग्रंथवाचन, 11 ते 12 भजन, 12 ते 12.30 आरती होईन दुपारी 12.30 ते 2 पर्यंत महाप्रसाद होईल. दुपारी 3 ते 6 श्रीमद् भागवत कथाकार हभप नंदकुमार रामदासी बीड हे कथेचे निरुपण करतील. सायं 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8.30 ते 10 पंचपदी भजन कार्यक्रम होईल.
सप्ताहामध्ये ‘श्री’चे ग्रंथवाचन व्यासपीठ चालक सौ.मनिषा भोंग करणार असून, ज्या भाविकांना पारायण करावयाचे आहे, त्यांनी विजय मते (9225322389), यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना ग्रंथ उपलब्ध करुन देता येईल. आणि 24 तास अखंड नाम जपास 1 तास बसायचे असेल तर त्यांनी अशोक मुळे (9420953328) यांच्याशी संपर्क करावा, म्हणजे त्यावेळेत माळेची व्यवस्था करण्यात येईल, असे रेखाताई रिंगणे यांनी सांगितले.
सप्ताहाची सांगता सोमवार दि.3 जुलै 2023 रोजी सकाळी 8 ते 9 ‘श्री’च्या पादुका, ग्रंथाची मिरवणुक काढण्यात येणार आहे. 9 ते 11 हभप कृष्णा रामदासी महाराज (बीड) यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सांगता होईल. तरी भाविकांनी अखंड हरिनाम, भागवत कथा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसाद रिंगणे यांनी केले आहे.