शेतकऱ्यांचा बलिदानामुळेच शेतकरी आंदोलन यशस्वी : हजारे

केंद्राने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी वर्षभर ठाण  मांडून बसलेल्या शेतकऱ्यावर विविध संकटे आली . कित्तेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला . शेवटी सरकारला  शेतकऱ्यांन समोर झुकावे लागले .आणि केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन  कर्त्यांचा  मागण्या मान्य करीत  तिन्ही कृषी  कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केली .
याबाबत जेष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांना प्रतिक्रिया विचारली असता  अण्णा हजारे यांनी  हे शेतकरी आंदोलनाचे यश असून शेतकऱ्यांनी या आंदोलनात आपले बलिदान दिल्यामुळे आंदोलनाला यश मिळाले असल्याचे सांगत देशात स्वतंत्र काळापासून आंदोलन केल्याने यश मिळत आले आहे .दरम्यान हे यश विरोधकांचे नसून केवळ आंदोलनकर्त्यांचे आहे .याबाबत विरोधक जर   यांचे श्रेय घेत असतील तर हे हास्यास्पद असून  बलिदान केलेल्या त्या शेतकरी आंदोलन कर्त्यांवर  हा अन्याय असल्याचे  हजरे  यांनी सांगितले. दरम्यान, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही कृषी कायद्याविरोधातील  आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता .