सभापती निवडीनंतर स्थायी समितीकडे बजेट सादर होणार – आयुक्त शंकर गोरे
नगर : महापालिकेचा आगामी वर्षाचा बजेटची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे . प्रशासनाकडून बजेट अंतिम टप्यात आले आहे . मात्र स्थायी समितीचे सभापती पद रिक्त असल्यामुळे सभापती निवडीनंतर मनपाकडून स्थायी समितीकडे बजेट सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली . दरम्यान सभापती निवडणुकीचा प्रस्ताव हि विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे .
गेल्या महिनाभरापासून मनपा प्रशासन स्तरावर बजेटची तयारी चालू आहे . लेखा विभागाने सर्व विभागांकडून तरतुदीचे प्रस्ताव मागविले होते त्यावर अनेक वेळा बैठका हि घेण्यात आल्या . त्यांनतर आता बजेट हि अंतिम टप्प्यात आले आहे . येत्या दोन चार दिवसात बजेटचे काम पूर्ण होणार आहे .मात्र दोन दिवसापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सदस्यांचा निवडी वेळी सभापती अविनाश घुले यांनी राजीनामा दिल्याने प्रशासनाकडून स्थायी कडे बजेट सादर होण्यास विलंब होणार आहे .
प्रशासनाने दर – कर वाढीचा प्रस्ताव यापूर्वी स्थायी समितीकडे पाठविला होता . त्यांनी तो आता महासभेकडे पाठविला आहे . १ ९ फेब्रुवारीपूर्वी त्यावर निर्णय झाल्यास तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाईल . त्यात मंजुरी मिळाली तरच बजेटवर त्याचा परिणाम होईल . मनपाकडून बजेट तयार झाले आहे . अंतिम तपासणी सुरू आहे . सभापती निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविलेला असून , सभापती निवडणूक झाल्यावरच मनपा प्रशासनाकडून स्थायी समितीकडे बजेट सादर केले जाणार असल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले .