समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने स्टेट बँक चौकाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरणाचे फलकचे अनावरण.
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील स्टेट बँक चौक नसून हा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. अनेक वर्षापासून या चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे नाव असून नावाचे फलक रस्त्याच्या उजव्या बाजूला अनेक वर्षापासून लावलेले होते. व उड्डाणपुलाच्या कामानिमित्त नावाचे फलक काढण्यात आले असून अनेक वेळा अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने मनपा आयुक्त यांना सांगून देखील फलक लावण्यात आले नसून समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने स्वखर्चातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरणाचा फलक लावण्यात आला आहे व अहमदनगर महानगरपालिकेने नव्याने सभेत ठराव मंजूर करून घेऊन मनपाच्या वतीने लवकरात लवकर फलक लावून सुशोभीकरण करण्याची मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली असून यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, सोमा शिंदे, किरण दाभाडे, सिद्धार्थ आढाव, योगेश साठे, नगरसेवक राहुल कांबळे, प्रशांत गायकवाड, प्रा.जयंत गायकवाड, विशाल गायकवाड, अक्षय भिंगार दिवे, जय भिंगार दिवे, नितीन कसबेकर, विजय गव्हाळे, विशाल गायकवाड, सचिन शेलार, विवेक भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, अमित काळे, शैनेश्वर पवार, आकाश तांबे, अक्षय गायकवाड, अक्षय पाथरीया, शादुल भिंगारदिवे, शिवम भिंगारदिवे, अर्जुन पाखरे, दया गजभिये, अक्षय नरवडे, चिकू गायकवाड, अक्षय बोरुडे, शेखर पंचमुख, लखन गायकवाड, मोना विधाते, रामा काते, मंगेश मोकळ, बंटी भिंगारदिवे, अतुल भिंगारदिवे, प्रकाश भिंगारदिवे, विशाल गायकवाड, किरण जाधव, प्रवीण मोरे, सनी माघाडे, जय कदम, किशोर कुमार, दीपक अमृत, संदीप वाघचौरे, पवन भिंगारदिवे, स्वप्निल भिंगारदिवे, कृपाल भिंगारदिवे आदीसह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.