सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचा अभिनंदनाचा ठराव

नगर तालुक्यातील निमगाव वाघाची मासिक सभा नुकतीच पार पडली. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने सामाजिक, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तर सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, ग्रामपंचायत सदस्या मुन्नाबी शेख, उज्वला कापसे, लता फलके, सुजाता कापसे, किरण जाधव, दिपक गायकवाड, प्रमोद जाधव, संजय कापसे उपस्थित होते.

सरपंच रुपाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पै. नाना डोंगरे यांनी सत्काराला उत्तर देताना मिळालेला पुरस्कार हा ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मिळाला आहे. गावात सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, विकासात्मक बदल घडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. याप्रसंगी ज्ञानदेव कापसे, जयवंता केदार, दिपक जाधव, नवनाथ फलके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.