सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नगर – माहेरून पैसे आणावेत म्हणून सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने राहता घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . शुभांगी शरद काकडे (वय २१ ,रा वाळुंज पारगाव ता. नगर ) असे आत्महत्या केलेल्या विवाहिते चे नाव आहे . हि घटना वाळुंज पारगाव शिवारात गुरुवारी रात्री अडीच वाजता घडली . या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे . वैशाली हरिश्चंद्र गुलदगड (वय ३९ रा. सिव्हिल हडको गणेश चौक नगर ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे . शुभांगी चा पती शरद गोरख काकडे व भाऊ रवींद्र गोरख काकडे यांचा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास फैजदार बोराडे करत आहेत .