सुगंधी तंबाखू विक्री प्रकरणी एकास अटक .
भिंगारमधील छापा टाकून सुगंधित तंबाखू विक्री करण्याऱ्यास एकास अटक करण्यात आली आहे . हि कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे .
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहिती नंतर हि कारवाई करण्यात आली . काचेचा गोडाऊन शेजारी पठाण ने पत्र्याचा शेड मध्ये सुगंधित तंबाखू साठवून ठेवली होती . त्यानांतर पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचा मार्गदर्शनाखाली हवालदार दिनेश मोरे , कमलेश पाथरूट पोलीस नाईक शंकर चौधरी नाईक योगेश सातपुते यांचा पथकाने हा छापा टाकला .